पावसाळ्यात केस गळणं हे काही नवीन नाही, त्यासाठी अनेक उपाय केले जातात.
केसांना नीट तेल लावल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते.
केसगळती थांबवण्यासाठी हा उपाय ट्राय करा.
केसांची चमक गेलेली असल्यास, कोरडे असल्यास मोहरीच्या तेलात एरंडेल तेल मिसळा.
त्यामुळे केसगळती बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
पावसाळ्यात अनेकदा केसांना मसाज करण्याचा सल्ला दिला जातो, तेव्हा या तेलाने मसाज करा.
हे तेल थोडं गरम केल्यानंतरच वापरायचे लक्षात ठेवा.
तेलातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे केसांना नैसर्गिकरित्या केराटिनसुद्धा मिळते.