पावसाळ्याचे आगमन होताच घरात डास-माशा येतात.

यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारातील महागड्या वस्तूंचा वापर करतात.

काही हर्बल वनस्पती माशा, डासांना दूर करण्यासाठी उपयोगी पडतात.

औषधी गुणधर्म  असेलली तुळस घरापासून डासांना दूर ठेवते.

लेमन ग्रॉसचा सुवास, डास आणि कीटक येण्यापासून रोखेल.

लॅव्हेंडर वनस्पतीपासून निघणारा सुगंध कीटकांना दूर ठेवतो, त्यामुळे चांगली झोप लागते.

माश्या आणि डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही झेंडू लावू शकता.

तुम्ही घरात पुदिना लावू शकता, त्याचा ताजा आणि तीव्र वास डासांना घरात येण्यापासून रोखेल.

रोज मेरीच्या वुडी वासामुळे डास घरात येणार नाहीत आणि आजूबाजूलाही उडणार नाहीत.