सध्या साऱ्यांनाच पांढऱ्या केसांची समस्या भेडसावत आहे.
प्रदूषण, चुकीच्या खाण्याच्या सवयी,जीवनशैली, तणाव यामुळे केस लवकर पांढरे होतात.
पांढऱ्या केसांसाठी मेंदी, रंग वापरतात ज्यात घातक रसायने असतात.
नैसर्गितरित्या केस काळे करण्यासाठी कांदा केसांना लावू शकता.
कांद्याच्या रसामध्ये काही अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हायड्रोजन पेरॉक्साइडची पातळी कमी करण्यास मदत करतात.
कांद्यांचा रस केसांना लावून पांढरे केस काळे कसे करायचे जाणून घ्या.
दोन ते तीन कांदे किसून त्याचा रस काढा. रात्री झोपण्यापूर्वी कांद्याचा रस टाळूवर आणि केसांना नीट लावा.
रात्रभर राहू द्या. त्यानंतर सकाळी सौम्य शाम्पूने केस धुवा.
चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता.