देशात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
त्याचा फायदा वीज उत्पादक कंपन्यांना होत आहे.
या कंपन्यांच्या शेअरवरही त्याचा परिणाम दिसत आहे.
वीज उत्पादक कंपनी RatanIndia चे शेअर्स हे याचे उत्तम उदाहरण आहे.
या स्टॉकमधील गुंतवणूकदारांची गुंतवणूक 30 दिवसांत दुप्पट झाली आहे.
2 मे रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 9.15 रुपये होती.
तर आता 2 जून रोजी या शेअरची किंमत 19.15 रुपये झालेली आहे.
गुंतवणुकीत ही 109% पेक्षा जास्त वाढ आहे.
गेल्या 5 दिवसांमध्ये हा शेअर 20 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.