सकाळी नियमितपणे योगासनं करावी. त्यामुळे आजार दूर राहतात.
सकाळी योगासनं करण्याची योग्य वेळ जाणून घ्या.
योगासनं सकाळी ब्रह्म मुहूर्तावर किंवा त्यानंतर 2 तासांनी करावीत.
सकाळी 4 ते 7 या वेळेत योगासनं करणं शरीरासाठी उत्तम मानलं जातं.
यावेळी तुमचे शरीर पूर्णपणे ताजे राहते. मनालाही शांती मिळते.
ब्लड सर्कुलेशन नीट होते, तसेच तुम्ही शुद्ध हवेत श्वास घेतल्याने बरं वाटतं.
उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार टाळण्यासाठी तुम्ही दररोज योगासने करावीत.
21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.