हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधीय गुण आहेत.
हळदीत अँटीबॅक्टेरियल,अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.
सुंदर आणि मुलायम त्वचेसाठी हळदीचा असा वापर करा.
हळद तांदळाच्या पिठात मिसळून चेहऱ्यावर लावा.
त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघेल, चेहरा तजेलदार होईल
दह्यात हळद मिसळून चेहऱ्याला लावा.
असे केल्याने चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होईल, त्वचा मुलायम राहील.
बेसन आणि दह्यात हळद मिसळून चेहऱ्यावर लावावी.
यामुळे त्वचा चमकदार, मुरुमांपासून मुक्त आणि मुलायम राहील.