चुकीच्या आहारामुळे अनेकदा नखं कमकुवत होतात.
नुसतंच नेल आर्ट करून नखांचं सौंदर्य वाढत नाही त्यासाठी ती स्ट्राँग असणंही गरजेचं आहे.
चांगल्या नखांसाठी प्रोटीन,व्हिटामिन बी 12ची आवश्यकता आहे. अंड्याचा डाएटमध्ये समावेश करा.
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने झिंक मिळते. नखांचा पिवळसरपणाही निघून जातो.
बीन्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि बायोटिनचे गुणधर्म असतात. नखांची चांगली वाढ होण्यास मदत होते.
निरोगी नखांसाठी, प्रथिने आणि मॅग्नेशियम समृद्ध असलेले बदाम खा.
पालेभाज्यांमध्ये लोह, फोलेट आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नखं चांगली होतात.
चांगल्या नखांसाठी या पोष्टिक गोष्टी नक्की खा. काळजी घ्या.