वास्तू शास्त्रानुसार पैसे घरात योग्य दिशेला ठेवावे.
पैसे चुकीच्या दिशेला ठेवल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
एवढंच नाही तर पैसे चुकीच्या दिशेला ठेवल्यास कर्जाचा बोजा पडू शकतो.
आग्नेय अर्थातच दक्षिण-पूर्व दिशेला पैसे ठेवू नये.
या दिशेला पैसे ठेवल्याने पैसा टिकत नाही खर्च होतोच.
वास्तूनुसार पश्चिम दिशेला पैसे ठेवणंही अशुभ मानतात.
या दिशेला पैसे, धन ठेवल्याने आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
पश्चिम-उत्तर अर्थातच वायव्येलाही धन ठेवू नये.
असे मानले जाते की या दिशेला पैसा ठेवल्याने कर्ज वाढू शकते.