स्वयंपाकघर हे घरातील महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे त्यात वास्तुदोष नसावा.
अन्नपूर्णा देवी स्वयंपाकघरात वास करते. हे देवी लक्ष्मीचे रुप आहे.
स्वयंपाकघर वास्तूनुसार असेल तर देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा यांच्या कृपेने घरात भरपूर संपत्ती येते.
स्वयंपाकघराशी संबंधित वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन न केल्याने धनहानी, रोग, प्रगतीत अडथळा यासारख्या समस्या येतात.
वास्तूनुसार किचनमध्ये तवा आणि कढई कधीही उलटी ठेवू नयेत.
कढई उलटी ठेवल्यास अन्नपूर्णा देवी नाराज होते.
तवा उलटा ठेवल्यास पैशांची चणचण भासते.
वास्तूनुसार तवा नेहमी आडवा ठेवावा. यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते.