अनेक महिला घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतात. 

ऑफिसमुळे मुलांसोबत कमी वेळ घालवल्याने या महिलांना दोषी असल्यासारखं वाटतं.

मात्र, असं करणाऱ्या तुम्ही एकट्या नाहीत, अनेक महिला ही तारेवरची कसरत करत असतात.

स्मार्ट पॅरेंटिंगच्या टिप्सने तुम्ही कामाबरोबरच मुलांसोबतही वेळ घालवू शकता.

काम आणि घरासाठी टाईम मॅनेजमेंट उत्तमप्रकारे करा.

मुलांसोबत क्लालिटी टाईमसाठी जरूर वेळ काढा.

आठवड्याच्या सुरुवातीलाच जेवण, कपडे आणि गोष्टींचं योग्य वेळापत्रक करा.

कुटुंबातल्या सदस्यांची मदत घ्या, आणि नीट वेळापत्रक बनवा.

तुमच्या मुलांनाही घरातील कामांमध्ये सहभागी करून घ्या. त्यामुळे मदतच होईल.