योगासनं शरीरासाठी आणि मानसिक स्थैर्यासाठी फायदेशीर आहेत.

ही 4 योगासनं शरीराला लवचिक करण्यासाठी मदत करतात.

सुप्त पदांगुष्ठासन शरीराला लवचिक बनवण्यास मदत करते. याचा नियमित सराव केल्याने तणावही दूर होतो.

सुशिरंध्रासनाच्या सरावाने शरीर लवचिक बनते. याशिवाय, असे केल्याने नितंबांचे स्नायू देखील मजबूत होतात.

अधो मुख श्वानासनामुळे शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. पाठ, खांदे आणि पाय यांचे स्नायू मजबूत होतात.

भुजंगासनाचा दररोज सराव केल्याने शरीर आणि कंबरेत लवचिकता येते.

पोटावर झोपा. आता हात डोक्याजवळ ठेवून कंबरेचा पुढचा भाग वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा. काही काळ या स्थितीत रहा.

ही योगासने नियमित केल्यास शरीर लवचिक होण्यास मदत होते.