नुसतं नाकावरूनच नाही तर ओठांवरूनही तुम्हाला तुमचा स्वभाव कळतो.
ज्यांचा खालचा ओठ मोठा आहे, अशा व्यक्ती खूप चिकित्सक स्वभावाच्या असतात.
बोलण्यावर ताबा नसल्याने अनेकदा या व्यक्ती एकट्या पडतात.
मात्र, अभ्यासात या व्यक्ती हुशार असतात.
वरचा ओठ मोठा असणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो.
त्यांना कर्तृत्ववान जीवन जगायला आवडतं, मात्र या व्यक्ती खूप मूडीही असतात.
चारचौघांमध्ये उठून दिसण्यासाठी या व्यक्ती खूप मेहनत घेतात.
दोन्ही ओठ बारीक असणाऱ्या व्यक्ती मृदूभाषिक असतात.
मात्र, कामात त्यांच्या वेगाशी मॅच करणं इतरांना कठीण जातं.
बारीक ओठांच्या व्यक्ती व्यवहारिक असतात, त्यांच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हटलं जातं.