www.navarashtra.com

Published Sept 3, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit -iStock

भारताने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पाच दिवस अविश्वसनीय कामगिरी केली आहे, यामध्ये कोणत्या पॅरा खेळाडूंनी भारताला कोणते पदक मिळवून दिले यावर नजर टाका.

भारताची पॅरा शुटर अवनीने सुवर्ण पदक मिळवून भारताला पहिले पदक मिळवून दिले, हे तिचे पॅरालिम्पिकमध्ये दुसरे मेडल होते. 

अवनी लेखारा

मनीष नरवाल याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौम्य पदकावर नाव कोरले आहे, पॅरिस २०२४ मध्ये पदक जिंकणारा तो एकमेव पॅरा शुटर आहे.  

मनीष नरवाल

.

१० मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या दोन महिला पॅरा शुटरने कमाल केली, अवनी लेखाराने सुवर्ण आणि मोना अग्रवालने कांस्यपदक नावावर केले. 

मोना अग्रवाल

पॅरा शटलर नितेश कुमारने फायनलच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक नावावर केले आहे. 

नितेश कुमार

जागतिक स्तरावर कमाल करणारी भारताची तिरंदाज जोडी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कांस्यपदक मिळवले आहे. 

शीतल देवी/राकेश कुमार

मनीषा रामदास हिने ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये डेन्मार्कच्या कॅथरीन रोसेन्ग्रेन हिचा पराभव करून मेडल नावावर केलं. 

मनीषा रामदास

भारताचा स्टार पॅरा भालाफेकपटू सुमित अंतीलने पॅरालिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. 

सुमित अंतील 

भारताची धावपटू प्रीती पाल हिने तिच्या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये धमाकेदार कामगिरी करून २ कांस्यपदक नावावर केले आहे. 

प्रीती पाल

पॅरा शटलर सुहास यथिराज हा सलग दुसऱ्यांदा सिल्वर मेडल मिळवण्यात यशस्वी झाला आहे, त्याला अंतिम सामन्यात फ्रान्सच्या शटलरने पराभूत केलं. 

सुहास यथिराज

पॅरा शुटर रुबिना फ्रान्सिस हिने १० मीटर पिस्तूल शूटिंगमध्ये कमाल करून कांस्यपदक नावावर केले.  

रुबिना फ्रान्सिस

उंच उडी स्पर्धेमध्ये निषाद कुमारने २.०४ मीटर उडी मारून सिल्वर मेडल नावावर केले, हे त्याचे पॅरालिम्पिकमधील दुसरे मेडल होते.

निषाद कुमार

पॅरा बॅडमिनपटू नित्या श्री सिवन ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये इंडोनेशियाच्या शटलर पराभूत करून कांस्यपदक मिळवले. 

नित्या श्री सिवन

योगेश कथुनियाने त्याचे पॅरिस पॅरालिम्पिकमधील ४२.२२ मीटर गोळा फेकून सलग दुसरे सिल्वर मेडल नावावर केले.

योगेश कथुनिया

पॅरा शटलर तुलसीमथी मुरुगेसन हिला फायनलच्या सामन्यात चीन विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिला रौम्य पदकावर समाधान मानावे लागले.

तुलसीमथी मुरुगेसन

15 दिवस प्या लवंगेचे पाणी, मिळतील जबरदस्त फायदे