साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसलेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीय.

भाजपच्या तिकीटावर ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज आहेत उदयनराजे भोसले.

हटके स्टाईल, दिलखुलास व्यक्तीमत्त्व, बोलण्यातील बिंधास्तपणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

सध्या त्यांच्या संपत्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

स्थावर आणि जंगम संपत्ती 1 अब्ज 90 कोटी 93 लाख 64 हजार 634 रुपये आहे.

सगळ्या भोसले घराण्याची संपत्ती 2 अब्जपेक्षा जास्त आहे.

मर्सिडीज, ऑडी डी, फॉर्च्युनर,स्कॉर्पिओ, एस क्रॉस अशा आलिशान गाड्या आहेत.