₹25 लाखांच्या बजेटमध्ये दमदार डिझेल इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देणाऱ्या midsize SUVs चे काही आकर्षक पर्याय बाजारात आहेत.
Picture Credit: pinterest
डिझेल इंजिनमधून मिळणारा मजबूत टॉर्क, लांब प्रवासातील आराम आणि चांगल्या रनिंग कॉस्टमुळे अनेक SUV खरेदीदार अजूनही डिझेलला पसंती देतात.
Picture Credit: pinterest
Kia Seltos मध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिनसह ऑटोमॅटिक पर्याय मिळतो. 116hp आणि 250Nm टॉर्क देणारे हे सेटअप शहरासह हायवे ड्राइव्हसाठी उपयुक्त ठरते. किंमत सुमारे ₹14.99 लाखांपासून सुरू होते.
Picture Credit: pinterest
Tata Sierra मध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक मिळते. इंजिन 118hp आणि 280Nm टॉर्क देते. डिझाइनसोबत मोठी केबिन आणि फीचर्स ही देखील याची वैशिष्ट्ये आहेत.
Picture Credit: pinterest
Creta मध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिनसोबत 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. 116hp आणि 250Nm आउटपुटसह ही SUV स्मूथ आणि रिफाइंड ड्राइव्हसाठी ओळखली जाते.
Picture Credit: pinterest
Scorpio N मध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन असून ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 175hp आणि 400Nm टॉर्क मिळतो. मोठा आकार, 7-सीटर लेआउट आणि 4x4 पर्यायामुळे ही SUV वेगळी ठरते.
Picture Credit: pinterest
या यादीतील सर्वाधिक पॉवरफुल पर्यायांपैकी XUV 7XO एक आहे. 2.2-लिटर डिझेल इंजिन 185hp आणि ऑटोमॅटिकसोबत 450Nm टॉर्क देते. 6-स्पीड ऑटोमॅटिकसह दमदार परफॉर्मन्स हा याचा मोठा प्लस पॉइंट आहे.
Picture Credit: pinterest
जास्त पॉवर हवी असल्यास XUV 7XO आणि Scorpio N, तर संतुलित फॅमिली SUV म्हणून Creta किंवा Seltosचा विचार करता येतो. Sierra देखील डिझाइन आणि फीचर्समुळे लक्षवेधी पर्याय आहे.
Picture Credit: pinterest
फक्त इंजिन पॉवर पाहू नका. तुमचा रोजचा रनिंग, शहरातील ट्रॅफिक, हायवे वापर, सर्व्हिस खर्च आणि तुमच्या बजेटनुसार योग्य व्हेरिएंट निवडा.
Picture Credit: pinterest