आजही आपल्या देशात अशा अनेक विचित्र परंपरा आहेत, जिथे महिलांचा व्यापार केला जातो.
मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात धाडीचा नावाची प्रथा आहे, जिथे आजही विवाहित महिला ते अविवाहित तरुणी भाड्याने मिळतात.
शिवपुरीत दरवर्षी भाड्याने मुली आणि महिलांचा बाजार भरतो, त्यात भाड्याने मुली विकत घेण्यासाठी लीलाव केला जातो.
मुलींची खरेदी-विक्रीची परंपरा इथे शतकानुशतके चालत आली आहे, त्यामुळे मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होत नाही.
वृत्तानुसार, महिलांना खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांपासून लीलाव सुरू होतो तो थेट 4 लाख रुपयांपर्यंत जातो.
महिलांना खरेदी करण्यासाठी, 10 ते 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक करार केला जातो, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांच्या सह्या घेतल्या जातात.
जर एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री आवडत असेल तर तो पुढील वर्षी कॉन्ट्रॅक्ट वाढवू शकतो. ज्यासाठी त्यांना पुन्हा रक्कम भरावी लागते.
महिलांना हा करार मोडण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु तसे करण्यासाठी त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागते आणि कराराची रक्कम देखील द्यावी लागेल.
मुली आणि मुलांची संख्या समसमान राहावी यासाठी ही प्रथा
स्वीकारली जाते असं म्हटलं जात आहे.