'श्यामची आई' चित्रपटातून महेश काळेंचं संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण
‘श्यामची आई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे.
‘श्यामची आई’ चित्रपटाच्या निमित्ताने गायक महेश काळे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.
साने गुरुजींनी लिहिलेली ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..’ ही प्रार्थना नव्या सुरात आणि चालीत गुंफुन महेश काळे यांनी ती गाण्याच्या स्वरुपात प्रेक्षकांसमोर आणली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी महेश काळे यांनी संगीतबद्ध केलेली प्रार्थना जगभरातील सर्व शाळांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महेश काळे सांगतात की,“हे गाणं नसूम प्रार्थना आहे, एक संवेदना आहे. हे गाणं प्रत्येकाच्या मनात बसलं पाहिजे. गाण्याचे शब्द कायम लक्षात राहतील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केले आहेत”.
ते पुढे म्हणाले की, “कायम गायक म्हणून आपण तन्मयतेने तल्लीनतेने प्रेम वाटत असतो. पण त्याला जर सामाजिकभावनेची झालर मिळाली तर या सगळ्या कार्याला एक वेगळं स्थान प्राप्त होतं.”
सुजय डहाके यांनी ‘श्यामची आई’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
ब्लॅक अँड व्हाइटच्या अंदाजात सादर होणाऱ्या या चित्रपटात महेश काळे यांचं गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.