Published On 21 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
पनीर चिली सर्वांच्याच आवडीची डिश आहे, याची रेसिपीही फार सोपी आणि झटपट तयार होते
पनीर, कांदा, शिमला मिरची, आले-लसूण मिरची पेस्ट, तेल, लाल तिखट, कॉन्फ्लोर, सोया सॉस, शेजवान चटणी इ.
यासाठी प्रथम एका भांड्यात कॉन्फ्लोर, मीठ, लाल तिखट आणि पाणी घालून मिक्स करून घ्या
नंतर या मिश्रणात पनीरचे तुकडे टाका आणि गरम तेलात फ्राय करा
आता एक भांड्यात तेल टाकून त्यात चिरलेला कांदा आणि शिमला मिरची काही मिनिटे परतून घ्या
भाज्या शिजल्या की मग यात आले-लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करा
यानंतर यात सोया सॉस आणि शेजवान सॉस घालून मिक्स करा. एका वाटीत एक चमचा कॉन्फ्लोर आणि पाणी घालून एक द्रावण बनवा आणि साहित्यात टाकून मिक्स करा
शेवटी यात तळलेले पनीरचे तुकडे घाला आणि मिक्स करून काही मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या
तयार पनीर चिली गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा. सजवण्यासाठी तुम्ही यावर कांद्याची पातदेखील घालू शकता