मलायकाने कुटुंबासोबत साजरा केला ओणमचा सण 

Photo Credit -malaika arora/instagram

 मलायका अरोराने नुकतेच ओणम सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मलायकाने आई-बाबा आणि बहिण अमृताच्या कुटुंबासोबत ओणम सेलिब्रेट केला.

ओणमसाठी खास फुलांची रांगोळी आणि सजावट करण्यात आली होती.

ओणमसाठी विविध पदार्थ बनवण्यात आले होते. मलायकाची आई जॉयस अरोराने या सणासाठी घरी जय्यत तयारी केली होती.

मलायकाने केळीच्या पानावर वाढलेल्या पक्वान्नांचा फोटोही शेअर केला आहे.

हे फोटो शेअर करताना मलायकाने सगळ्यांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मलायकाच्या कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला.

मलायका आणि अमृताची मुलंही यावेळी आजीकडे आली होती.