नागपूरच्या 4 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने जाहीर केलाय.

श्री गोपाळकृष्ण मंदिर, संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, श्री बृहस्पती मंदिर, श्री. दुर्गामाता मंदिर या मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू

हे कपडे घालून आता मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

तोकडे कपडे, स्कर्ट, जीन्स, टी-शर्ट, हाफपॅण्ट घालून मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

तोकडे कपडे घालून मंदिरात आल्यास ओढणी, पंचा भाविकांना देण्यात येईल. 

नागपूरपाठोपाठ संपूर्ण राज्यामध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

तुळजापूरच्या मंदिरातही यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. 

देशातील मंदिरे, गुरुद्वारा,चर्च, मशिदीमध्ये ड्रेसकोड आधीपासूनच लागू आहे.