काव्याची मंगळागौर साजरी करण्यासाठी सजल्या साऱ्या जणी

कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत दोन बहिणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

‘काव्यांजली’ मालिकेत अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी काव्याची भूमिका साकारत आहे.

अंजलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारत आहे.

‘काव्यांजली’ मालिकेत काव्याची मंगळागौर बघायला मिळणार आहे.

काव्याच्या मंगळागौरीसाठी सगळ्या सजून आल्याचं पाहायला मिळेल.

नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने असा मराठमोळा लूक मंगळागौरीच्या वेळी पाहायला मिळणार आहे.

मंगळागौरीसाठी ‘काव्या’नेही हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

‘काव्यांजली’चा मंगळागौर स्पेशल भाग प्रेक्षकांना 28 आणि 29 ऑगस्टला संध्याकाळी 8: 30 वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.