गालावर खळी,डोळ्यात धुंदी...मानुषी छिल्लरच्या स्माईलवर चाहते फिदा
Photo Credit-manushi_chhillar/instagram
माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
मानुषी नेहमी तिच्या लेटेस्ट लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर साडी लूकचे फोटो शेअर केले आहेत.
तिने एम्ब्रॉयडरी केलेली साडी नेसली आहे आणि त्यासोबत स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे.
तिने गळ्यामध्ये कुंदन चोकर नेकलेस घातला आहे.
फोटोमध्ये दिसणारी तिच्या गालावरची खळी आणि क्यूट स्माईल पाहून चाहते फिदा झाले आहेत.
तिने या फोटोमध्ये नॅचरल मेकअप केलाय आणि ग्लॉसी लिपस्टिक लावली आहे.
तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.