मानुषी छिल्लरची लंडन फॅशन वीकमध्ये हवा

मिस वर्ल्ड असलेली अभिनेत्री मानुषी छिल्लर सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे.

लंडन फॅशन वीक 2023 मध्ये मानुषीने पदार्पण केलं आहे.

मानुषी छिल्लर म्हणते, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत असता तेव्हा तुमच्यावर वेगळी जबाबदारी असते.

लंडन फॅशन वीकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचं मानुषी सांगते.

मानुषी छिल्लरसाठी हा एक फॅशन वीक नसून भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासारखे आहे. 

देशाची समृद्ध संस्कृती, विविधता आणि प्रतिभा जगासमोर दाखवण्याचा मानुषी प्रयत्न करतेय.

तिच्या लंडन फॅशन वीकमधल्या लूकची सध्या खूप चर्चा होतेय.

आगामी काळात मानुषी छिल्लर ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपटात दिसणार आहे.