मराठी रंगभूमी गाजवलेले नट असं म्हटलं तर आपल्या सर्वांसमोर एकच नाव उभं राहतं ते म्हणजे अभिनेते प्रशांत दामले यांचं. आजवर प्रशांत दामलेंनी बऱ्याच नाटकात काम केले आहे.
मराठी रंगभूमी जगलेला नट म्हणून प्रशांत दामलेंची ओळख आहे. प्रशांत दामलेंनी नुकताच त्यांचा ६२ वा वाढदिवस साजरा केला.
प्रशांत दामले यांनी आजवर अनेक नाटकांमधून बहुरूपी भूमिका साकारल्या आहेत. प्रशांत दामले सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
मी एक महत्वाची घोषणा करत आहे. आमचं नाटक 'नियम व अटी लागू' ते आजपासून त्याचे जिथे कुठे प्रयोग असतील तिथे पुढच्या पाच सीट्स कॉलेज तरुणांसाठी फ्री मध्ये राखीव ठेवण्यात आल्या आहेत.