Published Jan 07, 2025
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रकाशझोतात आली.
ऐश्वर्या नारकर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केलंय.
कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूट शेअर केले.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये ऐश्वर्या यांनी जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीवर ऐश्वर्या यांनी प्रिंटेड कॉटन ब्लाऊज परिधान केला आहे.
शेअर केलेल्या फोटोंना ऐश्वर्या यांनी ‘मन तळ्यात मळ्यात…’ असं कॅप्शन साडीतील फोटोंना दिले आहे.
ऐश्वर्या यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.
ऐश्वर्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर कायमच इन्स्टावरील रिल डान्समुळे चर्चेत असतात.