प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

तिच्या या पोस्टची सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

प्राजक्ताने तिचं संपूर्ण नाव बदलून'प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी' असल्याचं जाहीर केल आहे.

"नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावा नंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे,

"हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे महाराष्ट्र शासनाने" असं प्राजक्ताने म्हटलंय.

प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींनी या निर्णयाचं स्वागत केलंय तर काहींना हा निर्णय पसंत पडलेला नाही.

काहींनी प्राजक्ताचं अनुकरण करत स्वत:च्या आईचं नाव जोडलंय.