अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
सोनाली फोटोशूट, प्रोजेक्ट यांची माहिती वेळोवेळी चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतीच सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केलेली आहे.
कॅप्शनमध्ये, मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिलेल्या आहेत.
फोटोत सोनालीने लाल काठ आणि केशरी साडी नेसलेली आहे.
सोनालीचा नेकलेसही हटके आहे, त्या नेकलेसवर बाराखडी आहे.
लाईट मेकअप, केस मोकळे सोडलेले आहेत आणि चंद्रकोर लावलेली आहे.
सोनालीच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलेला आहे.