सोशल मीडियावर सध्या 'नाच गं घुमा' सिनेमाची जोरात चर्चा सुरू आहे.

परेश मोकाशी दिग्दर्शित हा सिनेमा 1 मे ला थिएटरमध्ये रिलीज होतोय.

या सिनेमाच्या गाण्यावर सारेच रिल बनवत असल्याचं दिसत आहे.

नम्रता संभेरावने सिनेमाच्या प्रमोशननिमित्त हे हटके फोटोशूट केलं आहे.

पिवळ्या रंगाच्या पैठणीचा कुर्ता, आणि डेनिम जीन्स वेअर केली आहे.

अटायरला मॅचिंग असे दागिने, नाकात नथ घातलेली आहे.

ड्रेसच्या पाठीमागे 'नाच ग घुमा' असं लिहिलेलं आहे.

नम्रताने कपाळावर चंद्रकोर, स्मोकी मेकअप करत लूक पूर्ण केलेला आहे.