लग्नाच्या पहिल्या दिवशी नववधू नवरदेवाला दुधाचा ग्लास देते, हे तुम्ही बऱ्याच सिनेमांमध्ये पाहिलं असेल.
हिंदू धर्मानुसार दूध शुद्ध असून ते शुभ मानलं जातं.
नव्या आयुष्याची सुरुवात पावित्र आणि शुद्ध व्हावी यासाठी दूध दिलं जातं.
ही एक पंरपरा आहे. मात्र, यामागील कारणं अनेकांना माहिती नाहीत.
या दुधात केशर, बडीशेप, साखर, हळद असे पदार्थ घालण्यात
येतात
.
दूध, केशर आणि बदामामुळे थकवा दूर होतो आणि ताकद मिळते.
टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनसारखे हार्माोन्स तयार होण्यासाठी या प्रथिनांची
मदत होते.
यामुळे नवरा-बायकोचं नातं अधिक घट्ट होतं असं मानलं जातं.