‘बस्ती का हस्ती’ एमसी स्टॅन बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज

 रॅपर एमसी स्टॅन ‘बिग बॉस 16’ या कार्यक्रमाचा विजेता ठरला होता. आता एमसी स्टॅन सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘बस्ती का हस्ती’ एमसी स्टॅनला सलमान खानने मोठी संधी दिली आहे. 

सलमानच्या ‘फर्रे’ या सिनेमाच्या माध्यमातून एमसी स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमासाठी स्टॅन पार्श्वगायन करणार आहे.

‘फर्रे’ हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

एमसी स्टॅन या रॅपरचं खरं नाव अल्ताफ शेख आहे. 

  वयाच्या बाराव्या वर्षी त्याने रॅप सॉन्ग गायला सुरुवात केली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून तो पुढे आला आहे.

एमसी स्टॅनने इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना त्याच्या बॉलीवूड पदार्पणाविषयी सांगितलं आहे.

तरुण वर्ग त्याच्या नव्या गाण्याची प्रतीक्षा करत आहे.