सेलिब्रिटींचे मेट गालामधील लूक कायम चर्चेत असतात. 

यंदा आलिया आणि ईशा अंबानीच्या लूकचा जलवा पाहायला मिळाला.

मेट गाला 2024 ची यंदाची थीम होती 'द गार्डन ऑफ टाइम'

ईशा अंबानीने थीमनुसार साडी गाऊन घातला होता.

डिझायनर राहुल मिश्राने ईशा अंबानीचा हा लूक डिझाईन केला होता.

फुलं, फुलपाखरे, ड्रॅगनफ्लाय यांच्यासोबत जरदोजी, नक्षी आणि भरतकाम करण्यात आलंय.

कोरीवकाम आणि मिनिएचर पेंटिंग असलेली बॅगही ईशाने कॅरी केली आहे.

तर आलियाने सब्यासाचीने डिझाइन केलेली साडी वेअर केलेली आहे.

ही फ्लोरल डिझायनर साडी तयार करण्यासाठी 1965 तास लागले.

आलिया या साडीत खूपच स्टनिंग आणि गॉर्जिअस दिसत आहे.