चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरावर ताण पडतो, डोकेदुखी होते.

मायग्रेनच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी घरगुती उपाय करून पाहा.

लिंबाच्या पानांना मायग्रेनच्या समस्येवर रामबाण उपाय मानले जाते.

डोके दुखत असताना लिंबाची पाने हातात कुस्करून त्याचा वास घेतल्यास लगेच ताजेतवाने वाटू लागते.

लिंबाची पानं चावून खाल्ल्याने तणावापासून सुटका मिळते.

व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते, वजन कमी होते.

कधीकधी पोटाशी संबंधित समस्यांमुळे डोकेदुखी देखील होते.

डोकेदुखीसाठी तुम्ही थोडं मीठ घालून लिंबू पिळून कोमट पाणी देखील पिऊ शकता.

सोडियमच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, मिठाचे पाणी प्यायल्याने या समस्येपासून आराम मिळतो.