दुधावर घट्ट साय येण्यासाठी आज तुम्हाला एक सोपी ट्रिक आम्ही सांगत आहोत.
दुधावरची साय खाणं अनेकांना आवडतं, काहीजण त्यापासून तूप करतात.
मात्र, अनेकांची ही तक्रार असते की दुधावर घट्ट साय येत नाही. त्यासाठी ही युक्ती
पहिल्यांदा दूध 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर उकळा.
दुधाला उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी त्यावर जाळी ठेवा.
दूध थंड करण्यासाठी जाळीच वापरा. प्लेट वापरल्यास दूधावर घट्ट साय येत नाही.
दूध पूर्णपणे थंड झाल्यावर ते न ढवळता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
सुमारे 2-3 तास दूध फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दुधावर घट्ट साय तयार होते.