घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावावा. यामुळे घरात सकारात्मकता राहते.
घराचा आरसा धुसर नसावा.
घरातील आरशाची फ्रेम नेहमी चौकोनी असावी. त्यामुळे वास्तुदोष राहत नाही.
ज्या ठिकाणी पैसा ठेवला आहे किंवा कपाट आहे त्याच्या समोर आरसा लावावा. यामुळे घरातील संपत्ती वाढते.
आरसा कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावू नये. त्यामुळे घरात कलह निर्माण होतो.
घरात एका आरशासमोर दुसरा आरसा नसावा, त्यामुळे घरातील व्यक्तींमध्ये तणाव निर्माण होतो.
घरात तुटलेली काच ठेवू नये. हे अशुभ आहे.
अनेकजण घरामध्ये काठाला तुटलेला आरसा पाहायला मिळतो. परंतु असा आरसा घरात दारिद्र्य आणतो.
बिछान्यासमोर आरसा कधीही नसावा. त्यामुळे घराच्या विकासात अडथळा येतो.