‘मिशन रानीगंज’च्या स्क्रिनिंगसाठी अक्षयसह ट्विंकल आणि डिंपल कपाडियांची हजेरी

अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट 6 ऑक्टोबरला रिलीज होतोय.

या चित्रपटात कोळसा खाणीतल्या 65 मजुरांच्या संघर्षाची कहाणी मांडण्यात आली आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 नुकतंच या चित्रपटाचं स्क्रिनिंग मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं.

‘मिशन रानीगंज’च्या स्क्रिनिंगसाठी अक्षय कुमारसोबत त्याची बायको ट्विंकल खन्नानेही हजेरी लावली.

अक्षयने यावेळी काळा शर्ट आणि मिलिट्री प्रिंट ट्राउजर घातली होती.

ट्विंकलने पिंक शर्ट आणि ट्राउजर घातली होती.

स्क्रिनिंगसाठी डिंपल कपाडियानेही हजेरी लावली.

सिंपल लूकमध्ये ती स्क्रिनिंगसाठी आली होती.