सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मनसेचे झिरमिळ्या आंदोलन  - मनसे नेते, कैलास दरेकर

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात बीड मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झिरमिळ्या आंदोलन करण्यात आले.

आष्टी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणारी कामे निकृष्ट दर्जाची असून यासंदर्भात वारंवार निवेदन, पत्रव्यवहारही केला.

प्रशासन कुठली दखल घेत नसल्याने बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर समोर निवेदनाच्या झिरमाळ्या लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

यावर प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे नेते कैलास दरेकर यांनी दिला आहे.