घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. याचा वापर केल्याने आर्थिक संकट दूर होते, असे म्हणतात.
जर तुम्ही घरात मनी प्लांट लावणार असाल तर चुकूनही घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावू नका.
मनी प्लांटची वेल खाली झुकलेली नसावी किंवा जमिनीला स्पर्श करता कामा नये.
वास्तूनुसार घरातील मनी प्लांटची वेल जमिनीला स्पर्श करत असेल तर घरामध्ये गरिबी येते.
जर तुम्ही घरात मनी प्लांट लावत असाल तर हे देखील लक्षात ठेवा की ते कधीही कोरडे होऊ नये.
घराच्या वॉशरूमच्या आसपास चुकूनही मनी प्लांट लावू नका, ते अशुभ मानले जाते
जर कोणी तुमच्या मनी प्लांटची वेल मागितली तर त्याला नकार द्या, त्याचप्रमाणे दुसऱ्याकडून घेऊ नका.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटच्या व्यवहारावर शुक्र ग्रहाचा प्रभाव पडतो, ज्यामुळे गरिबी येते.