सध्या केस गळणे किंवा तुटणे ही समस्या अनेकांना भेडसावत आहे.
पावसाळ्यात केस गळणे कॉमन आहे, हवेतील आर्द्रतेमुळे केस कमकुवत होतात.
आर्द्रतेमुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते.
जर तुम्ही पावसात भिजत असाल तर केसांसाठी ते जास्त हानिकारक आहे.
पावसाळ्यात कोंडा होण्याचा धोकाही जास्त असतो त्यामुळे केस गळतात.
पावसाळ्यात केस गळण्याच्या समस्येवर या टिप्सचा उपयोग करा.
झोपण्यापूर्वी केस कोरडे करा, ओले केस तुटण्याची शक्यता अधिक असते.
केस तुटत असतील तर हेअरस्टाईल करणे टाळा, केस घट्ट बांधू नका.
केस विंचरण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरा
खूप प्रमाणात पाणी प्यायल्यानेही केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते.