मान्सूनमुळे वातावरणात गारवा आल्याने थोडा दिलासा मिळालेला आहे.
बदलणाऱ्या हवामानामुळे बऱ्याच जणांना डोकेदुखीचा त्रास होतो.
काही घरगुती उपाय करून डोकेदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.
बदामात मॅग्नेशियम असते त्यामुळे मायग्रेन दूर होण्यास मदत होते.
तुळशीची पानं पाण्यात टाकून उकळवा, त्यानंतर त्यात मध टाकून प्या.
लिंबू पाण्याच्या सेवनामुळे पोट साफ होते, मन शांत होते. डोकेदुखीही कमी होते.
आल्याचे छोटे तुकडे करून थोडे पाण्यात उकळा, नंतर हे पाणी प्या, डोकेदुखी दूर होईल.
चहा किंवा कॉफी प्यायल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते.