पावसाळ्यात तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला किंवा भिजला तर या चुका टाळा
स्मार्टफोन सुकवण्यासाठी चुकूनही हेअर ड्रायर वापरू नका, ज्यामुळे फोनचे हार्डवेअर खराब होऊ शकते
मोबाईल ओला झाल्यास ओव्हन किंवा कारच्या बोनेटवर ठेवू नका.
स्मार्टफोन पाण्यात पडल्यास त्यानंतर लगेच तो चार्ज करू नका.
फोन ओला असताना त्याच्या पोर्टमध्ये पिन टाकू नका. मदरबोर्डपर्यंत पाणी पोहोचून ते खराब होऊ शकते.
मोबाईल ओला
झाल्यास
तो लगेच स्वीचऑफ करा.
फोन ओला झाल्यावर आणि बंद केल्यानंतर फोन कापडाने पुसून घ्या.
स्मार्टफोन ओला झाल्यानंतर, लगेचच सिम आणि एसडी कार्ड काढावे.
ओला फोन सुकल्यानंतर तो जोराजोरात हलवा, म्हणजे त्यातील सर्व पाणी बाहेर पडेल.