स्कूटरमध्ये बाइकप्रमाणे गिअर पेडल नसते. तरीही ती सहज वेग पकडते. यामागे आहे एक खास ऑटोमॅटिक ट्रान्समिशन टेक्नॉलॉजी!
Picture Credit: Pinterest
बहुतांश पेट्रोल स्कूटरमध्ये CVT म्हणजेच Continuously Variable Transmission असते. ही यंत्रणा चालकाला गिअर बदलण्याची गरज न पडू देता इंजिनची शक्ती चाकांपर्यंत पोहोचवते.
Picture Credit: Pinterest
CVT सिस्टीममध्ये बेल्ट आणि दोन बदलत्या व्यासाच्या पुली महत्त्वाची भूमिका बजावतात. पुलीमधील बेल्टची स्थिती बदलल्याने ट्रान्समिशन रेशो बदलतो.
Picture Credit: Pinterest
चालक ॲक्सिलरेटर फिरवतो, तेव्हा इंजिनचा वेग वाढतो. त्यानुसार CVT यंत्रणा ट्रान्समिशन रेशो बदलते आणि स्कूटरचा वेग हळूहळू वाढू लागतो.
Picture Credit: Pinterest
स्कूटरमध्ये साधारणपणे सेंट्रिफ्यूगल क्लच असतो. इंजिनचा वेग वाढल्यावर तो आपोआप जोडला जातो आणि इंजिनची शक्ती ट्रान्समिशनमार्फत मागच्या चाकापर्यंत पोहोचते.
Picture Credit: Pinterest
CVT मधून मिळणारी शक्ती अंतिम ड्राइव्ह यंत्रणेद्वारे मागच्या चाकापर्यंत जाते. त्यामुळे चालकाला गिअर बदलण्याची गरज न पडता स्कूटर पुढे सरकते.
Picture Credit: Pinterest
वेग आणि इंजिनवरील भार यानुसार CVT ट्रान्समिशन रेशो बदलते. त्यामुळे वेग वाढवताना किंवा चढ चढताना इंजिनची शक्ती योग्य प्रकारे वापरण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
बेल्ट, रोलर्स आणि क्लचच्या स्थितीचा स्कूटरच्या कामगिरीवर परिणाम होतो. त्यामुळे कंपनीने सांगितलेल्या वेळापत्रकानुसार सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
स्कूटरमध्ये गिअरच नसतात असं नाही; तर पारंपरिक बाइकप्रमाणे चालकाला गिअर बदलावे लागत नाहीत. CVT आणि ऑटोमॅटिक क्लचमुळे स्कूटर चालवणं अधिक सोपं होतं.
Picture Credit: Pinterest