मृणाल ठाकुर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राइज देत असते.
ती जितकी बोल्ड लूकमध्ये सुंदर दिसते तितकीच ती एथनिक लूकमध्येही सुंदर दिसते.
त्यामुळेच तिच्या फोटोमुळे चाहते दरवेळी आश्चर्यचकित होतात.
मृणालने नुकतचं गुलाबी ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.
बंद गळ्याचा आणि फुल स्लीव्हजचा गुलाबी कुर्ता आणि मॅचिंग पलाझो असा तिचा लूक आहे.
चिकनकारी आणि रेशमी धाग्यांचं वर्क तिच्या कुर्त्यावर करण्यात आलंय.
तिचा हा लूक फेस्टिव्हलसाठी एकदम योग्य आहे.
लाइट वेव्ही हेअरस्टाइल आणि मिनिमम मेकअप यामुळे ती खूप सुंदर दिसतेय.
लवकरच मृणाल ‘आँख मिचोली’ आणि ‘नानी 30’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.