खणाच्या साडीत खुललं मृण्मयीचं सौंदर्य

 अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय.

या कार्यक्रमासाठी मृण्मयी देशपांडे खास खणाची साडी नेसली होती.

मृण्मयीने या हिरव्या खणाच्या साडीसोबत मोत्यांचा हार, कानातले आणि नथ घातली आहे.

मृण्मयीच्या या साडीच्या पदरावर छान मोराचं डिझाइन आहे.

साडीसोबत तिने आंबाडा घातलाय आणि त्यावर गजराही लावलाय.

मृण्मयी लवकरच एका मराठी सिनेमातही झळकणार आहे.

‘सुभेदार’ या चित्रपटात ती केशरची भूमिका साकारणार आहे.

तिचा हा चित्रपट 25 ऑगस्टला रिलीज होणार आहे.