होळी, धुलिवंदनासाठी मुंबई पोलिसांनी जारी केली नियमावली

होळीचा सण धुलिवंदन मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जाते पण सणाच्या नावाखाली अनेक घटनाही घडतात, त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे.

यावर्षी ५ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण वेगवेगळ्या प्रदेशात साजरे केले जाणार आहेत.

अश्लील शब्द किंवा घोषणा वापरू नका किंवा सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाऊ नका.

जेश्चर किंवा मिमिक्री वापरू नका तसेच, कोणत्याही व्यक्तीची चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर वस्तू किंवा गोष्टी प्रदर्शित किंवा प्रसारित करु नका.

पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारू नका.

रंगीत किंवा साधे पाणी, कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे फेकून मारू नका