राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात रामध्वज फडकवण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्तही अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज पाहायला मिळतील.

मात्र त्यानंतर हे झेंडे इकडे तिकडे पडलेले दिसतात. ध्वज सन्मानपूर्वक ठेवण्यासाठी (NDMC) ने पुढाकार घेतला आहे.

एनडीएमसीने काही नंबर्स जारी केले आहेत. राम ध्वज आणि राष्ट्रध्वज जमा करण्यासाठी केंद्रीकृत क्रमांक 1533 आणि NDMC 311 

निवासी कल्याण संघ, मार्केट ट्रेडर्स असोसिएशन, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि NDMC मधील व्यक्तींनी विविध राम ध्वज आणि राष्ट्रध्वज वापरला.

खराब झालेले, फाटलेले ध्वज योग्य ठिकाणी जमा करावे.

सर्व RWAs, MTA आणि NDMC क्षेत्रातील रहिवासी आणि सेवा वापरकर्त्यांना असे ध्वज त्यांच्या संबंधित क्षेत्र स्वच्छता कार्यालयात जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

NDMC परिसरात 14 ठिकाणी स्वच्छता कार्यालये आहेत. NDMCच्या वेबसाइटवर संबंधित अधिकाऱ्यांची ठिकाणे आणि संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.

अशाप्रकारे राष्ट्रध्वज योग्य ठिकाणी जमा करावा.