नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीला समर्पित, महत्त्व जाणून घ्या

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. 

देवी ब्रह्मचारिणीला  ज्ञान, तपस्या आणि वैराग्याची देवी मानलं जातं.

पार्वती मातेचं तपश्चर्येचं आचरण करणारं स्वरुप म्हणजे ब्रह्मचारिणी.

देवी पार्वतीने दक्ष प्रजापतीच्या घरी ब्रह्मचारिणीच्या रुपात जन्म घेतला.

देवी पार्वतीचं अविवाहित रुप मानल्या जाणाऱ्या ब्रह्मचारिणी देवीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.

देवीच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव खुश झाले आणि त्यांनी देवीला शंकर तुला पती म्हणून प्राप्त होतील असं वरदान दिलं.

कठोर तपश्चर्येचं आचरण करणारी म्हणून देवी पार्वतीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी देवी असं नाव देण्यात आलं.

 एका हातात रुद्राक्षांची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू असं देवीचं रुप मनमोहक आहे.