कुष्मांडा देवी नक्की आहे तरी कोण ?

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते.

कुष्मांडा देवीला गडद निळा रंग प्रिय असल्याने नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्रे परिधान करावीत.

वाईट कृत्य करणाऱ्यांचा तसेच राक्षसी शक्तींचा नाश होण्यासाठी या देवीची उपासना केली जाते.

 पौराणिक कथांनुसार जेव्हा सगळीकडे फक्त अंधार होता तेव्हा देवी कुष्मांडाने आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली. त्यामुळे तिचं नाव कुष्मांडा पडलं.

आदिशक्तीचं स्वरुप असलेली ही देवी सूर्यमंडळाच्या अंतस्थळी राहणारी आहे.

देवीला आठ हात असल्याने तिला अष्टभुजा देवीदेखील म्हटले जाते.

ब्रह्मांडातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुष्मांडा देवीचा अंश असल्याचं मानलं जातं.

रोगांपासून मुक्ती देणारी आणि सुख- समृद्धी देणारी ही देवी असल्याचं मानलं जातं.