प्रतिपदेला गाईच्या तुपाचा गोड नैवेद्य अर्पण केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते.

द्वितीयेला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा, दीर्घायुष्य लाभते असं मानतात.

तृतीयेला दुधाचा अभिषेक करून दुधाच्या वस्तू अर्पण केल्याने दुःखातून मुक्ती मिळते.

चतुर्थीला मालपुआचा नैवेद्य केल्याने बुद्धिमत्ता वाढते असं म्हणतात.

पंचमीला केळ्यांचा नैवेद्य अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते.

षष्ठीला मध अर्पण केल्याने पती-पत्नीमधील आकर्षण वाढते.

सप्तमीच्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्याने संकटांचा नाश होतो असं मानतात.

अष्टमीला नारळाचा प्रसाद अर्पण करणे मुलांसाठी चांगले असते.

नवमीला नैवेद्य म्हणून खीर अर्पण केल्याने आनंद आणि समृद्धी मिळते.