लाल भोपळ्याचे गोड घारगे, नवरात्रीच्या उपवासात बेस्ट ऑप्शन.. 

खिचडीऐवजी लाल भोपळ्याचे घारगे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

 हे भोपळ्याचे घारगे कसे करायचे जाणून घ्या. 

2 लाल भोपळ्याचे तुकडे, 1/2 वाटी किसलेला गूळ, मिश्रणात मावेल इतका साबूदाणा, वरीचं पीठ, सुंठ, वेलची आणि तेल

भोपळ्याचे तुकडे बिया, सालं काढून कुकरमध्ये शिजवून घ्या. स्मॅश करा. गूळ टाकून एकजीव करा. 

त्यानंतर त्यात साबुदाणे,वरीचं पीठ, सुंठ, वेलची आणि चवीनुसार मीठ घालून कणिक मळा. 

10 मिनिटांनी पुन्हा एकदा नीट मळून घ्या. छोटया छोट्या पुऱ्या लाटून घ्या. 

 गरम गरम तेलात पुऱ्या सोनेरी रंगावर तळून घ्या. 

उपवासाचे भोपळ्याचे घारगे रेडी आहेत.