नवरात्रीत देवी दुर्गेच्या 9 रूपांची वेगवेगळ्या दिवशी विशेष पूजा केली जाते.
नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.
तुम्हालाही आर्थिक संकट सतावत असेल तर हा उपाय नक्की करून पाहा.
नवरात्रीमध्ये घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू लावून देवीची पावलं काढावीत.
दारावर काढलेली देवीची पावलं घराच्या आतील बाजूस असावीत हे लक्ष ठेवा
विशेषत: अष्टमी आणि नवमीच्या दिवशी देवीची पावलं काढावीतच.
असे मानले जाते की हे केल्याने संकटं दूर होतात.
नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी गुलाब, कमळाची फुले अर्पण करावीत.
असे मानले जाते की असे केल्यास देवी प्रसन्न होते